Pune: काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या विरोधानंतरही 323 रस्ते रुंद करण्याचा विषय बहुमताने मंजूर

Pune: Despite the opposition of Congress-NCP-Shiv Sena, the issue of widening 323 roads was approved by a majority by bjp शहरातील 6 मीटर रस्त्यांची रुंदी वाढवा. ठराविकच रस्त्यांची रुंदी वाढविल्यास राज्य शासन हस्तक्षेप करणार असल्याचा इशारा पवार यांनी दिला होता.

एमपीसी न्यूज- भाजपने अतिशय प्रतिष्ठेचा केलेला 323 रस्ते रुंद करण्याचा प्रस्ताव मंगळवारी (दि.9) स्थायी समितिच्या बैठकीत बहुमताने मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाला काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेने विरोध केला. 10 विरुद्ध 6 असे मतदान झाले.

शहरातील सर्व 6 मीटरचे रस्ते 9 मीटर करण्याबाबत हरकती – सूचना मागविण्याच्या उपसूचनेसह हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

हा प्रस्ताव मंजूर झाल्याने शहरातील विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केला. तर, ठराविक बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना-काँगेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांतर्फे करण्यात आला होता.

सर्वच रस्ते 9 मीटर रुंद करावेत किंवा 6 मीटर रस्त्याच्या कडेला असलेल्या मिळकतींना टीडीआर आणि प्रीमियम एफएसआय वापरण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या तिन्ही विरोधी पक्षांनी महापालिका आयुक्त आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती.

शहरातील 6 मीटर रस्त्यांची रुंदी वाढवा. ठराविकच रस्त्यांची रुंदी वाढविल्यास राज्य शासन हस्तक्षेप करणार असल्याचा इशारा पवार यांनी दिला होता. अध्यक्ष हेमंत रासने यांनी बैठकीत उपसुचनेसह प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे आता शहरातील विकास झपाट्याने होणार असल्याचा विश्वास भाजपला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.