Pune District Football : पुण्याच्या विजयात पूजाची हॅटट्रिक

एमपीसी न्यूज –  पुणे जिल्हा फुटबॉल ( Pune District Football ) संघाने मुलींच्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत दमदार सलामी दिली. त्यांनी आपल्या पहिल्याच सामन्यात हिंगोलीचा 8-0 असा धुव्वा उडवला. 

नाशिक येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत शनिवारी पुणे संघांच्या (Pune District Football) विजयात पूजा गुप्ता हिची कामगिरी महत्वाची ठरली. तिने शानदार हॅटट्रिक साजरी केली. तनया गायकवाड हिने दोन गोल करून तिला सुरेख साथ केला. पियुषा नरके, रोशन पंडित आणि संजना गुप्ता यांनी एकेक गोल करून पुण्याचा मोठा विजय साकारण्यात आपली भूमिका बजावली.

 

Rakshak Matrubumiche : सेना दलात प्रवेश म्हणजे ‘सुरक्षित’ भविष्याची खात्री आणि देशसेवेची संधी – ब्रिगेडियर हेमंत महाजन

पुण्याच्या मुलींचा दणका इतका जबरदस्त होता की त्यांनी विश्रांतीलाच 8-0 अशी आघाडी मिळविली. त्यांच्या या धडाक्याची हिंगोलीने इतकी धास्ती घेतली की त्यांनी मध्यंतरानंतर सामनाच सोडून दिला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.