Pune : भाजीपाला खरेदीसाठी स्वतःसह इतरांचे जीव धोक्यात घालू नका : रुबल अग्रवाल

कोरोना नियंत्रणासाठी कडक निर्बंध आवश्यक 

एमपीसी न्यूज – मेथी, कोथिंबीरच्या खरेदी करण्यासाठी   स्वतःचे व इतरांचेही जीव धोक्यात घालू नका. कोरोनाचा वाढता संसर्ग, दैनंदिन प्राप्त होणारी आकडेवारी व एकूण परिस्थितीचा विचार करता सोशल डिस्टंसिंगसह  गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच कडक निर्बंधाची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले. 

किमान येत्या मे महिन्यात सर्वांनीच सामूहिकपणे प्रभावी लढा देउन कोरोनावर मात केल्यास या  लढ्यात आपण यशस्वी होऊ, असा विश्वासही त्यांनी  व्यक्त केला.  पुणे महानगरपालिका, पुणे शहर पोलीस यांच्यावतीने रामटेकडी, सय्यदनगर, चिंतामणीनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी या परिससराची पाहणी करण्यात आली.  त्यावेळी  त्या  बोलत  होते.

रामटेकडी, चिंतामनींनगर, सय्यदनगर येथील पाहणी प्रसंगी नगरसेवक अशोक कांबळे, माजी नगरसेवक फारूक इनामदार, क्षेत्रीय अधिकारी कुंजन जाधव उपस्थित होते. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी येथे  नगरसेविका रुपाली धाडवे, नगरसेवक बाळा ओसवाल, भीमा साठे, क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ बनकर, रवींद्र घोरपडे उपस्थित होते.  दोन्ही ठिकाणी सहपोलिस आयुक्त सुनील फुलारी, डीसीपी झोन- ४ चे सुहास बावचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, क्रांतिकुमार पाटील, सहाययक पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर (वानवडी ), मनपा सहआयुक्त सुरेश जगताप, उपायुक्त अविनाश सकपाळ व अन्य अधिकारी उपस्थितीत होते.

 

 कोरोनाला रोखण्याकरिता पुणे मनपा, पोलीस प्रशासन व शासन यंत्रणा अहोरात्र लढा देत आहेत. नागरिकांनी शासनाच्या सूचना पाळाव्यात.  केवळ घरीच रहाणे सुरक्षित आहे. विनाकारण बाहेर पडणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे.   भाजीपाला खरेदी वेळी नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे नाइलाजास्तव कडक कारवाई करणे आवश्यक झाले आहे. तरी, कोरोना लढाई करिता सर्वानीच सहकार्य करावे. सुनील फुलारी : सहपोलिस आयुक्त. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.