Pune: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य अधिकारीपदी डॉ. नितीन बिलोलीकर यांचीही नियुक्ती

सध्या नागरिकांनी कोरोनाची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना झाला म्हणून घाबरण्याचे कारण नाही. हा आजार वेळीच उपचार घेतल्यास बरा होतो.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतेच आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे आरोग्य अधिकारीपदी डॉ. नितीन बिलोलीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी ते पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले. त्या सोबतच महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे सुद्धा रुजू होणार असल्याचे समजते. दोन सहाय्यक आरोग्य प्रमुखांना कोरोना झाला आहे. पुणे शहरातील आरोग्य व्यवस्था सांभाळ करणारेच आजारी पडल्याने खळबळ उडाली आहे.

पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे यांना चार दिवसांपूर्वी मधुमेहाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना वैद्यकीय रजेवर सोडण्यात आले होते. कोरोनाबाधित आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.

त्यामध्ये दोन सहायक आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोना झाला. दुसरीकडे पुणे शहरात रोज 1600 ते 1800 रुग्ण वाढतेच आहेत. 1-1 बेड्स मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे तातडीने आरोग्य अधिकारी नियुक्ती करण्याची मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली होती.

सध्या नागरिकांनी कोरोनाची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना झाला म्हणून घाबरण्याचे कारण नाही. हा आजार वेळीच उपचार घेतल्यास बरा होतो.

मात्र, नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे. तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन पुणे महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.