Pune : महानगरपालिकेत नव्या आठ नगरसेवकांची निवड; स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील कांबळे यांना संधी मिळणार

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या 2018-19 या वर्षातील 16 सदस्यापैकी आठ स्थायी समिती सदस्यांची मुदत पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज आठ नगरसेवकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये आगामी वर्षासाठी स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील कांबळे आणि हेमंत रासने यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे या दोघापैकी एकाला स्थायी समिती अध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे महापालिकेतील भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या पक्षाच्या संख्या बळानुसार 16 स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती केली जाते. त्यानुसार 2018-19 या वर्षासाठी स्थायी समितीमधील भाजपचे सुनील कांबळे, मंजुषा नागपुरे, निलिमा खाडे, कविता वैरागे, राजेश बराटे आणि मारुती आबा तुपे तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान गटनेते दिलीप बराटे आणि आनंद अलकुंटे या आठ सदस्याचा कार्यकाळ आज संपुष्टात आल्याने 2019 आणि 2020 वर्षासाठी आठ नगरसेवकांची निवड करण्यात आली.

  • मात्र, त्यामध्ये भाजपचे नगरसेवक सुनील कांबळे यांना पुन्हा संधी देण्यात आली असून भाजपकडून नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, हेमंत रासणे, प्रकाश उर्फ बंडू ढोरे, दीपक पोटे, हिमाली कांबळे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक महेंद्र पठारे आणि अशोक कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.

तर 5 मार्च होणार्‍या मुख्य सभेत स्थायी समिती अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक असणार आहे. मात्र, स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील कांबळे आणि हेमंत रासने यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे या दोघापैकी एकाला स्थायी समिती अध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.