Pune : धायरी नांदेड रस्त्यावर तीन छोट्या कारखान्यांना आग

एमंपीसी न्यूज : धायरी-नांदेड रस्त्यालगत (Pune) बारंगाने मळा येथे तीन छोट्या कारखान्यांना आज सव्वा बाराच्या सुमारास आग लागली. यात कारखाने जळून खाक झाले असून सुदैवाने यात कोणही जखमी किंवा जीवित हानी नाही.

घटनास्थळी एक बॅटरीचा कारखाना व दुसरा मशीनरीचे पार्ट तयार करण्याचा कारखाना आणि तिसरे एक छोटे युनिट जिथे पाणी पूरी संबंधित मटेरियल बनविले जाते, अशा ठिकाणी आग लागली होती.

Chikhali : सिग्नलला गाडी बाजूला घेतली नाही म्हणूण एकाला दमदाटी करत मारहाण

हि आग दुपारी दीडच्या सुमारास पुर्णपणे विझवण्यात आली. घटनास्थळी पुणे अग्निशमन दलाकडून नवले, सिहंगड, कात्रज, वारजे, कोथरुड आणि मुख्यालय अशा पाच अग्निशमन दलाच्या गाड्या, 3 वॉटर टँकर अशी एकूण आठ वाहने होती.

घटनास्थळी आग कशामुळे लागली हे (Pune) अजून समजले नाही. कारखाने सुट्टी असल्याने कोणी कामगार नव्हते. जखमी वा जिवितहानी नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.