Pune : शेवटच्या क्षणातील गोलाच्या जोरावर भारतीय फूड कॉर्पोरेशन उपांत्यपूर्व फेरीत; इन्कम टॅक्स इलेव्हनची आगेकूच कायम

एमपीसी न्यूज – शेवटच्या क्षणातील गोलाच्या जोरावर भारतीय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघाने (Pune)उपांत्यपूर्व फेरीत इन्कम टॅक्स इलेव्हनला 3-2ने पराभूत केले आणि एमजे चषक तिसऱ्या निमंत्रित हॉकी स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. हा सामना गमावूनही इन्कम टॅक्स इलेव्हनचा संघ बाद फेरीसाठी पात्र ठरला आहे.

धनराज पिल्ले फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हॉकी महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली आणि एक्सलन्सी हॉकी अकादमीने आयोजित केलेल्या या स्पर्धा
नेहरूनगर पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू आहेत.

Pimpri : महापालिका तळमजल्यावरच पाणी देणार, पहिल्या मजल्यावर नाही

एफसीआय संघाकडून पूर्ण वेळेपासून दोन सेकंद बाकी असताना तेजस चौहान (६० वे) याने अप्रतिम गोल केला. इन्कम टॅक्सने सामना बरोबरीत ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न शेवटच्या क्षणाला अपुरे ठरले. नियमित वेळेत दोन्ही संघांनी चुरशीचा खेळ केलाचुरशीच्या लढत गुंतले होते. आदित्य रसाळ (१०व्या) याने पेनल्टी कॉर्नरमध्ये बदल करून एफसीआयला आघाडी मिळवून दिली. २७व्या मिनिटाला तेजस चौहानने आणखी एक गोल करीत एफसीआयला मध्यंतराला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

उत्तरार्धात अरविंद यादव (४०वा) याने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून इन्कम टॅक्सचे आव्हान कायम राखले पुनरागमन केले आणि त्यानंतर रोमेश पिल्ले (४४वा) यानेही पेनल्टी कॉर्नरवर गोल करून २-२ अशी बरोबरी साधली. तेजसने शेवटच्या मिनिटात अवघ्या दोन सेकंदात अप्रतिम गोल करीत एफसीआयला विजय मिळवून दिला.

पीसीएमसी, एसआरपीएफ, मध्य रेल्वे पुणे, हॉकी लव्हर्स क्लब, क्रीडा प्रबोधिनी, जीएसटी सीमाशुल्क पुणे, इन्कम टॅक्स पुणे आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे संघ बात फेरीत पोहोचले आहेत.


क्रीडा प्रबोधिनीने जीएसटी कस्टम पुणे संघावर ४-२ असा विजय मिळवला. धैर्यशील जाधव (दुसरे मिनिट) मयूर धनावडे (२६ वे, ५८ वे) आणि सागर शिंगाडे (३८ वे) यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर क्रीडा प्रबोधिनीला विजय मिळवता आला. जीएसटी कस्टम पुणे संघाच्या अनिकेत गुरव (१० वे ) आणि तालेब शाह (२१वे) यांनी गोल करून फरक कमी केला.

निकाल
सेंट्रल रेल्वे पुणे: 7 (युवराज वाल्मिकी ९वे; विनित कांबळे 10वे, 37वे; भूषण ढेरे17वे; गोविंद नाग 29वे, 32वा, विनोद निंभोरे 59वे) वि.वि हॉकी लव्हर्स क्लब: 2 (स्वप्नील गरसुंड 40 वे, प्रणव गरसुंड 58वे). -0
क्रीडा प्रबोधिनी: 4 (धैर्यशील जाधव २रा; मयूर धनवडे २६वे , ५८वे ; सागर शिंगाडे ३८वे) bt जीएसटी कस्टम पुणे: २(अनिकेत गुरव 10वे, तालेब शहा २१वे).
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुणे: 3 (आदित्य रसाळ 10वे ; तेजस चौहान 27वे, 60वे) वि.वि इन्कम टॅक्स पुणे: 2(अरविंद यादव40वे ; रोमेश पिल्ले ४४वे ).

क्रीडा प्रबोधिनी वि.वि एस एन डी पी कडून पुढे चाल
पीसीएमसी वि.वि. रोव्हर्स अकादमीकडून पुढे चाल

उपांत्यपूर्व फेरी

पीसीएमसी विरुद्ध हॉकी लव्हर्स क्लब- सकाळी 9.30
इन्कम टॅक्स पुणे विरुद्ध जीएसटी सीमाशुल्क पुणे सकाळी 1130 वाजता
मध्य रेल्वे पुणे ‘ब’ विरुद्ध एसआरपीएफ पुणे – दुपारी 1 वाजता

क्रीडा प्रबोधिनी विरुद्ध फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) – दुपारी 2.30

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.