Pune : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने परदेशी महिलेवर बलात्कार; अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लिफ्ट देण्याच्या बहाण्याने 28 वर्षीय परदेशी महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली. हि घटना मुंढवा मार्गावर सोमवारी (दि. 23) रात्री 7.30 ते पहाटे 3.30 च्या दरम्यान घडली. याप्रकरणी परदेशी महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यात बाईकवरुन लिफट देणाऱ्या इसमाचे वर्णन – अंगाने सडपातळ, रंगाने गोरा, अंगात पाढर शर्ट घातलेला वय अंदाजे 23 ते 25 वर्षे, हिंदी व इंग्रजी भाषा बोलत होता. तर, त्याचे सोबत असलेल्या मित्राचे वर्णन – रंगाने काळा सावळा, अंगाने मजबुत, वय अंदाजे 30 वर्षे, अंगात काळे रंगाचा फुल बाहयांचा शर्ट, त्यावर पाढरे ठिपके असलेला. डोकीचे केस कुरुळे व बारीक असे आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित परदेशी महिला सोमवारी (दि. 23) रोजी 7.30 च्या सुमारास एकटीच एंजन्ट जॅक्स हॉटेल मुंढवा पुणे येथे जेवण करण्यासाठी गेली होती. रात्री 12.00 च्या सुमारास ती एंजन्ट जॅक्स हॉटेलमधून जेवण करुन हॉटेल बाहेर रोडवर येऊन पुण्यातील राहत्या ठिकाणी जाण्यासाठी वाहन बुक करत होती. यावेळी एका पांढ-या रंगाचे बाईकवरुन एक अनोळखी इसमाने इंग्रजीमध्ये लिफ्ट हवी आहे का? असे विचारले. यावेळी पीडित परदेशी महिलेने त्याच्याकडे मदत करणार म्हणून विश्वासाने त्याच्या बाईकवर बसली.

यावेळी त्याने पीडित परदेशी महिलेच्या मोबाईलवरून आणखी एका मित्राला फोन करून बोलावून घेतले. आणि त्या दोघांनी पीडित परदेशी महिलेला एका अज्ञात निर्जनस्थळी ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यावेळी पीडितेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता तिला दोघांनी मारहाण देखील केली.

यावेळी पीडित परदेशी महिला खूप घाबरलेली होती. त्यानंतर त्या दोघांनी तिला तेथेच सोडून जात होते. यावेळी पीडित परदेशी महिलेने दोघांकडे विनंती करून मला या अज्ञात निर्जनस्थळी ठिकाणी सोडू नका, मला मेनरोडला सोडण्याची विनंती केली. त्यानंतर दोघांनी तिला मेनरोडला सोडतो म्हणून तेथून घेऊन निघाले. मेनरोडला येताच इतर काही मुलांना पाहून घाबरलेल्या पीडित परदेशी महिलेने आरडाओरडा केला असता बाईक चालविणाऱ्याचा तोल जाऊन तिघेही पडले. यात पीडित परदेशी महिला जखमी झाली. यावेळी ‘त्या’ दोघांनी तेथून बाईक घेऊन पळ काढला. यावेळी पळून जाणाऱ्या ‘त्या’ दोघांच्या बाईकचा नंबर 4456 असा होता, असे पीडित परदेशी महिलेने सांगितले. यावेळी मेनरोडला असलेल्या मुलांनी कपडे देऊन तिची मदत केली. याप्रकरणी पीडित परदेशी महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सांगितलेल्या वर्णनाच्या अज्ञात दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.