Pune : जांभुळवाडी दरी पुलावर चार वाहनांचा भीषण अपघात; दोन जण दगावल्याची भीती

एमपीसी न्यूज : जांभुळवाडी दरी पुलावर चार वाहनांचा भीषण (Pune) अपघात झाल्याची घटना घडली.  मोठ्या कंटेनरनची लक्झरी बस, टेम्पो व कारला धडक झाली.

घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून चार वाहने दाखल झाली असून अडकलेल्या दोन गंभीर जखमींना बाहेर काढत रुग्णालयात रवाना केले आहे.

पहाटे 03:56 वाजता अग्निशमन दलाला वर्दि मिळाली होती. गंभीर अवस्थेत काढलेले दोन जण मृत असण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.