Pune : शहरात 242 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 186 जणांना डिस्चार्ज, आजही 10 जणांचा मृत्यू

In the city, 242 new coronary heart disease patients, 186 discharged, 10 people still die today

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे शुक्रवारी 10 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 6 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. 186 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात 246 नवीन रुग्ण आढळले.

पुण्यात एकूण 6 हजार 93 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये 166 गंभीर रुग्ण असून, 45 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 303 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोथरूडमधील 72 वर्षीय पुरुषाचा सिम्बयोसिस हॉस्पिटलमध्ये, पांडवनगरमधील 56 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, रविवार पेठेतील 61 वार्षिक महिलेचा कर्वे रोड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

तसेच कल्याणीनगरमधील 72 वर्षीय महिलेचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, गंजपेठेतील 56 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, गोखलेनगर मधील 87 वर्षीय पुरुषाचा व शिरूरमधील 60 वर्षीय आणि येरवड्यातील 68 वर्षीय महिलेचा ससून रुग्णालयात, पर्वतीमधील 62 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, तर जुन्नरमधील 58 वर्षीय पुरुषाचा वायसीएम हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

पुणे शहरात आता कोरोनाचे 6 हजारांच्यावर कोरोना रुग्ण झाले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाला आहे. पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना या रोगातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे.

सध्या कोरोनाचा चचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्ण वाढत आहेत. मात्र, पुणेकरांनी घाबरून नऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.