Pune – सातबारा उता-यावर नोंद घेण्यासाठी 15 हजारांची लाच स्विकारणारे लाचलुचपतच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – वडिलोपार्जीत प्राप्त जमीनीची सातबारा उता-यावर नोंद घेण्यासाठी 15 हजारांची लाच स्विकारणा-या मंडल अधिका-यासह एकास  पुणे लाचलुचचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज बुधवारी (दि.12) रंगेहाथ पकडले आहे.

चंदशेखर जगन्नाथ दगडे (वय 50  रा. पुर्वा नगरी सोसायटी हडपसर), अशोक तात्याबा वाघमारे( वय 34 रा. उरळी कांचन) असे लाच स्विकारणा-या व्यक्तींची नावे आहेत.याप्रकरणी एका 40 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार,  तक्रारदार यांच्या व  पत्नीच्या नावावर वडिलोपार्जीत प्राप्त जमीनिच्या नोंदी  मंजुर करून त्या नोंदी  सातबारा उता-यावर नोंदविण्यासाठी थेऊर येथील मंडल अधिकारी चंदशेखर दगडे यांने तक्रारदाराकडे 15 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. ही बाब तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविली असता या तक्रारीची तपासणी करून आज  पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी सापळा रचून  लाच स्विकारणा-या दोघांना रंगेहाथ पकडले.त्यांच्यावर लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत असून पुढील तपास लोणीकाळभोर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.