Pune: ‘चाचण्या वाढल्याने कोरोना रुग्णांची संख्या जास्त’; पुणेकरांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही

Pune: 'Increased number of corona patients due to increase in tests'; There is no reason for Punekars to be scared, says pune municipal corporation पुणे शहरात सध्या रोज नव्याने 800 रुग्ण आढळून येत आहेत. पुण्यात 20 हजार 668 रुग्ण आहेत.

एमपीसी न्यूज- सध्या पुणे शहरात कोरोनाच्या रोज तब्बल 4 हजारांच्या वर चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. जास्तीत जास्त कोरोना चाचण्या झाल्यास उपचार करणे सोपे होते. वेळीच रुगणाला क्वारंटाईन करून मृत्यूचे प्रमाण टाळता येते. तसेच इतर नागरिकांनाही कोरोनाची लागण होण्याची भीती कमी होते.

पुणे शहरात सध्या रोज नव्याने 800 रुग्ण आढळून येत आहेत. पुण्यात 20 हजार 668 रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णसंख्या 7 हजार 276 आहे. तर, 700 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त लठ्ठपणा, किडनी विकार, हृदयविकार, उच्च रक्तदाब असे अनेक आजार होते. यामध्ये 45 ते 80 या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत.

सध्या लॉकडाऊन नाही- आयुक्त

या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. 12 हजार 500 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, पुणे महापालिकेतर्फे योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असल्याने सध्या तरी लॉकडाऊन करण्यात येणार नसल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

नागरिकांनी आवश्यक कामासाठीच बाहेर पडावे, मास्क लावावा, सॅनिटायजरचा वापर करावा, फिजिकल डिस्टनसिंग पाळावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1