Pune Accident : पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात

एमपीसी न्यूज : पुण्यातील नवले पुल गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पुलावर अवजड वाहनांच्या धडकेत अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. त्यातच आता पुन्हा एकदा नवले पुलावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.(Pune Accident) नवले पुलावर भरधाव कंटेनरने कारला धडक दिल्यामुळं मोठा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. परंतु कार आणि कंटेनरचा अपघात झाल्यानंतर मुंबई-बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटवरून येत असलेल्या भरधाव कंटेनरने पुलावरील कारला मागून जोरदार धडक दिली. चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. यात कुणालाही इजा झालेली नसली तरी कारचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. अपघात झाल्यानंतर भरधाव कंटेनरचा ड्रायव्हर फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. नवले पुलावरील भीषण अपघातानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातग्रस्त कंटेनर आणि कारला क्रेनच्या साहाय्याने पुलावरून बाजूला काढण्यात आलं आहे.

Chakan : चाकण येथे अचानक झाड कोसळले; अनेक दुचाक्या अडकल्या

गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील नवले पुलावर सातत्याने अपघात होत आहे. दोन दिवसांपूर्वीच नवले पुलावर कंटेनर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता.(Pune Accident) याशिवाय अवजड वाहनाच्या धडकेत तब्बल 40 वाहनं एकमेकांना धडकल्याची घटनाही नवले पुलावरून समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा कंटेनरने कारला धडक दिल्यामुळं मुंबई-बंगळुरू महामार्गावर काही किलोमीटरपर्यंत वाहनांचा रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.