Pune News: दिवाळीचा बोनस मागितल्याने धारदार शस्त्राने वार

एमपीसी  न्यूज : दिवाळीचा बोनस मागितल्याच्या कारणावरून एका पस्तीस वर्षीय व्यक्तीला धारदार शस्त्राने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुकाई दर्शन परिसरात हा प्रकार घडला. हडपसर पोलिस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाऊ सिताराम खंडू (वय 35) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी निरंजन चित्रणाथ योगी (वय 22), तपिन दिलीप विश्वकर्मा आणि शेरबहादूर उर्फ नवलसिंग विश्वकर्मा या तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तुळशीराम खंडू शिंदे यांनी तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, जखमी सिताराम शिंदे हे आरोपीकडे दिवाळीचा बोनस मागत होते. याच कारणावरून आरोपी नि त्याच्या गळ्यावर पाठीवर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.