Thergaon News : हजारो दिव्यांनी उजळला थेरगावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर

एमपीसी न्यूज – दिपावली पाडव्यानिमित्त शिव दीपोत्सवाने थेरगाव डांगे चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर हजारो दिव्यांनी उजळला. पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेचे प्रमुख विश्वजित बारणे यांनी या दीपोत्सवाचे आयोजन केले होते.

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह या दीपोत्सवात परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. महिला, नागरिक, युवक नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

युवा सेनेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. फुलांची सजावट केली होती. हजारो दिवे लावण्यात आले होते. शिव दीपोत्सावाच्या माध्यमातून संपूर्ण शिवसृष्टी परिसर उजळून टाकला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.