Pune News: जागतिक महिला दिनानिमित्त रिता शेटीया यांचा विविध संस्थांकडून गौरव

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त रिता इंडिया फाऊंडेशनच्या संस्थापिका रिता शेटीया यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल विविध संस्थाकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

ग्रेस लेडीज या सिंगापूरमधील संस्थेने ‘शी इज ग्लोबल’ या थिम अंतर्गत रिता यांना यावर्षीचा ‘ग्लोबल वूमन आयकॉन अवॉर्ड 2022 ‘ हा पुरस्कार ऑनलाईन दिला.  यंदा जागतिक स्तरावर पहिल्यांदाच प्रत्येक पुरस्कार प्राप्त महिलांचे व्हिडिओ घेऊन जागतिक स्थरावरवर ते प्रसिद्ध करणारी ग्रेस लेडीज ही पहिली संस्था आहे.

यावर्षी विविध देशातून आलेल्या एकूण 400 अर्जातून 60 अर्ज विविध पुरस्कारासाठी निवडण्यात आले. त्यामध्ये रिता यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. नुकतीच या पुरस्काराची ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड – ऑफ लाँगेस्ट व्हिडिओ मध्ये नोंद घेण्यात आली.

नमस्ते इंडिया ग्रुपतर्फे मदर ऑफ फ्रीडम राजमाता जिजाऊ माँसाहेब या अंतर्गत ‘ इंटरनॅशनल प्राउड वुमनिया अवॉर्ड 2022 ‘ हा पुरस्कार ऑनलाईन देण्यात आला. तर, रोटरी क्लब ऑफ पुणे 3131, चे प्रेसिडेंट सचिन परमार आणि वैशाली रावल यांच्या हस्ते रिता यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सर्व्ह टू चेंज लिव्हज या अंतर्गत कृतज्ञता प्रमाणपत्र देण्यात आले.

आरवीएस या संस्थे मार्फत “रत्नरागिणी नॅशनल अवॉर्ड 2022” देण्यात आला. गेली 17 वर्षे रिता शेटीया रिता इंडिया फाऊंडेशन अंतर्गत सामाजिक कार्य करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.