Pune News: पुणे विमानतळावर मोठी कारवाई, शारजाहून आलेल्या प्रवाशाकडे सापडले तब्बल तीन हजार अमेरिकन हिरे

एमपीसी न्यूज – शारजाहून पुणे विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाकडे तब्बल तीन हजार अमेरिकन हिरे सापडले. 75 कॅरेट वजनाच्या या हिऱ्यांची एकूण किंमत 48 लाख 66 हजार रुपये इतकी आहे.

कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून यात एकाला अटक देखील करण्यात आली आहे.

17 मार्च रोजी पुणे कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटला मिळालेल्या माहितीनुसार शारजाहून येणाऱ्या एका विमानात हिऱ्यांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पुणे कस्टम विभागाने केलेल्या एका प्रवाशाला अडवत त्याची चौकशी केली, चौकशी करत असतानाच त्या वेळेस त्याची पूर्ण तपासणी करण्यात आली असता सुमारे तीन हजार हिरे असल्याची माहिती सापडले.

कस्टम विभागाला एकूण 75 कॅरेट वजनाचे सुमारे तीन हजार हिरे आढळून आले. त्याची किंमत एकूण 48 लाख 66 हजार इतकी आहे. हे हिरे प्रवाशाच्या सामानात पॅक केलेल्या ट्राउझर्सच्या पाऊचमध्ये लपवून ठेवले होते. भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न केलेले हे हिरे सीमाशुल्क कायदा 1962 नुसार जप्त करण्यात आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.