Pune News : बिबवेवाडीतील अनधिकृत शेडवर पालिकेचा हातोडा, 39 हजार चौरस फूट क्षेत्र मोकळे

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकाम, हातगाड्या, खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यावर कारवाई केली जात आहे. पालिकेकडून आज (शुक्रवारी) बिबवेवाडी येथील हिल टॉप, हिल स्लोप याठिकाणी अनधिकृत शेडवर कारवाई कऱण्यात आली.

अनधिकृत शेडवर कारवाई करत तब्बल 39 हजार चौरस फूट एवढे क्षेत्र मोकळे करण्यात आले आहे. जेसीबी, ब्रेकर, गॅस कटर, बिगारी सेवक आणि पोलीस बंदेबस्त यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

पुणे महापालिकेने सोमवारी (दि. 09) येरवडा, कळस, धानोरी परिसरात अनधिकृत हातगाड्या व पथारी यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. कारवाई दरम्यान व्यावसायिकांकडून 2,500 रूपये दंड वसूल करण्यात आला. तसेच मोठ्या प्रमाणात माल ताब्यात घेण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.