Pune Old Building Collapse: पुण्यात जुन्या वाड्याची भिंत कोसळली; तीन घरातील 11 नागरिकांना अग्निशामक दलाच्या जवानांनी काढले बाहेर

एमपीसी न्यूज: मुसळधार झालेल्या पावसामुळे कोंडव्यातील जुना रिकामा वाडा पडल्याने एकच खळबळ उडाली. वाड्याची भिंत बाजूच्या घरावर पडल्याने घरातील 11 नागरिक मलब्याखाली दबले होते. (Pune Old building collapse) त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

 

 

Pune Fraud: सुरक्षा रक्षकाची फिल्ड ऑफिसरनेच केली फसवणूक

 

 

 गेल्या काही दिवसांपासून राज्यासह पुणे शहरात देखील मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक सोसायटी तसेच घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. तसेच जुन्या ईमारती, दरडी, झाडे कोसळण्याच्याही घटना घडत आहेत. (Pune Old building collapse) पुण्यातील कोंढवा बुद्रुक गावठाणातील दत्त मंदिरासमोर आज जुन्या वाड्याची भिंत बाजूच्या घरावर पडल्याने इतर तीन घरातील 11 रहिवाश्यांना अग्निशामक दलाच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेत कोणीही जखमी व जीवितहानी झालेली नाही.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.