Pune : सुखद ! ससूनमध्ये आज एकही मृत्यू नाही, 9 डिस्चार्ज; 20 पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज : पुण्यातील ससून रुग्णालयात आज एकही कोरोना मृत्यूची नोंद झालेली नाही. तसेच फक्त 20 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यातही 9  रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आल्याची  माहिती  बी.  जी.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडून  देण्यात आली. 

देशभरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोना टेस्टची संख्या वाढविल्याने पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे सरकाकडून सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे शहरात कोरोना कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. पुणे शहरात एकट्या ससून रुग्णालयात कोरोना मृतांची संख्या 59  झाली आहे. सुदैवाने आज एकही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. उलट 9  रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 284  संशयीत रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी फक्त 20 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सध्या ससूनमध्ये 114  कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तर 66 संशयित रुग्ण दाखल आहेत. गंभीर प्रकृती असलेल्या 5  रुग्णांना व्हेंटीलेटरवर उपचार सुरु आहेत. तर गंभीर असेलेलया 17  रुग्णांवर व्हेंटीलेटरशिवाय उपचार सुरु आहेत.  ससून रुग्णालयात आजपर्यंत 59  कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर या आजरातून बरे झालेल्या 13  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.