Pune : ‘जनता कर्फ्यु’ला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवाहन केलेल्या ‘जनता कर्फ्यु’ला पुणेकरांनी रविवारी सकाळपासूनच चांगला प्रतिसाद दिला. अनेक रस्ते मोकळा श्वास घेतायेत. महात्मा फुले मंडईत शुकशुकाट असून, भाजी विक्रेते यांनीही याला उत्तम प्रतिसाद दिला आहे.

लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, टिळक रोड, बाजीराव रोड, जंगली महाराज रोड, फर्ग्युसन रोड, कर्वे रोड, नगर रोड, सिंहगड रोड, स्वारगेट, परिसरात ‘जनता कर्फ्यु’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. आज रात्री 9 पर्यंत हा ‘जनता कर्फ्यु’ पाळण्यात येणार आहे.

एरव्ही या रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी होत असते. आज मात्र हे सर्वच रस्ते निर्मनुष्य झाले आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलीस ठाण मांडून आहेत. किराणा, मेडिकल या जीवनावश्यक वस्तू सुरू आहे. इतर दुकानांचे शटर पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. वारजे हायवे चौक, कात्रज मुख्य चौक, स्वारगेट रस्ते ओस पडले आहेत.

‘पीएमपीएमएल’च्या 1700 बसेस पैकी केवळ 25 टक्के बसेस रस्त्यांवर धावत आहेत. या बसेसमध्ये केवळ पोलीस, डॉकटर यांनाच प्रवेश दिला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. घरी राहा आणि सुरक्षित राहा, असे आवाहन पुणे जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.