Pune : जी – 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज : पुणे महानगरपालिकेच्या (Pune) वतीने जी – 20 परिषद व स्वच्छ सर्वेक्षण 2023 निमित्त मुख्य रस्ते, फूटपाथ व दुभाजकांवर थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

Pimpri News: साडेबारा टक्के परताव्याच्या निर्णयाचा अध्यादेश तत्काळ निघावा; भूमिपुत्रांची अपेक्षा

14 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान जी – 20 परिषदेच्या अनुषंगाने पुणे शहरामध्ये बैठका होणार आहेत. ह्या
बैठकांसाठी विदेशातील येणारे मान्यवर शहरातून फिरतील व त्या वेळेस त्यांना आपले शहर स्वच्छ दिसावे यासाठी पुणे महानगरपालिका प्रयत्नशील आहेत. या अंतर्गत पुणे विद्यापीठ (Pune) मार्गावर एका नागरिकावर कारवाई करून त्यांनी केलेली घाण त्यांच्याद्वारे स्वच्छ करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.