Pune: ‘कचरामुक्त शहरांच्या यादीत पुणे शहराला ‘थ्री स्टार’ मानांकन’

Pune rated as 'Three Star' for garbage free city केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत स्पर्धेत टिकण्यासाठी पुणे महापालिकेला हे 'थ्री स्टार' शहर मानांकन अतिशय महत्वाचे आहे.

एमपीसी न्यूज- कचरामुक्त शहरांच्या यादीत पुणे शहराला ‘थ्री स्टार शहर’ म्हणून मानांकन मिळाल्याचे गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी जाहीर केले.

त्याबद्दल स्वच्छता सेवक, अधिकारी व सर्व पुणेकरांना मनःपूर्वक धन्यवाद देत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

कचरामुक्त पुणे शहर आणि स्वच्छ पुणे शहर या संकल्पनेला बळ देणारा हा पुरस्कार आहे. आगामी काळात प्रशासनाला आणखी ताकद देण्यासाठी सर्व नगरसेवक, भाजपचे प्रयत्न राहणार आहेत.

या पुरस्काराबद्दल त्या खात्याचे प्रमुख, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सफाई कर्मचारी या सर्वांचे अभिनंदन करीत असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही सर्व अधिकारी, सफाई कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. शहरात रोज 2 हजार ते 2100 मेट्रिक टन कचरा गोळा होतो. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून देणे नागरिकांना बंधनकारक आहे. या सर्व कचऱ्यावर पुणे महापालिकेतर्फे प्रक्रिया केली जाते.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत स्पर्धेत टिकण्यासाठी पुणे महापालिकेला हे ‘थ्री स्टार’ शहर मानांकन अतिशय महत्वाचे आहे. पुणे शहर हे राहण्यासाठी उत्तम शहर असल्याचेही म्हटले आहे.

कचरा प्रक्रियेत पुणे महापालिकेचे अतिशय चांगले काम आहे. मागील वेळी हे मानांकन महापालिकेला मिळाले नव्हते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने हार न मानता आपले कार्य सुरूच ठेवले. अखेर हे मानांकन मिळाल्याने अधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.