Pune : डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून वैद्यकीय साहित्यासाठी पालिकेला वीस लाखाचा निधी

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारांसाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे महापालिकेला वीस लाखाचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी निधीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने डॉ. गोऱ्हे यांनी वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदीसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला.

या निधीतून पीपीई युनिट, इन्फ्रारेड थर्मामीटर, फेस मास्क, ग्लोव्हज् , सॅनिटायझर, टेस्टिंग कीट खरेदी करावे, असे गोऱ्हे यांनी पालिका प्रशासनाला सुचवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.