Pune : सुरक्षा, अतिक्रमण निर्मूलन विभाग, व्हेईकल डेपोतील वाहन-चालक यांनाही सुरक्षा कवच द्या -दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’विरोधात लढत असताना मृत्यू झाल्यास महापालिका अधिकारी-कर्मचारी यांच्या वारसांना एक कोटी रुपये मदत मिळणार आहे. तसेच त्यांच्या वारसांना महापालिकेत नोकरीही मिळणार आहे. या योजनेचा लाभ सुरक्षा, अतिक्रमण निर्मूलन विभाग, व्हेईकल डेपोकडील वाहन-चालक, ठेकेदारांकडील नियुक्त सेवक आणि विविध खात्याकडे एकवट मानधनावर कोविड – 19 प्रतिबंधासाठी सर्व्हे करणारे, समाजविकास विभागाकडील सेवक समूहसंघटिका, सेवा केंद्र समन्वयक, कार्यलयीन सहाय्यक व तत्सम सेवक यांनाही मिळावा, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली. त्यासंबंधीचे पत्र महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना देण्यात आले आहे.

या कर्मचाऱ्यांनाही दिवसरात्र कामकाज करावे लागत आहे, आशा सर्व सेवकांनाही नेमून दिलेले कामकाज काही प्रमाणात काही प्रभागात का होईना कोरोना प्रतिबंध करण्याचे काम करावे लागत आहे. त्यांना दररोज कामावर यावे लागत असून, बाधित नागरिकांशी कामकाज करताना नेहमीच संबंध येतो. त्यामुळे नमूद खात्यामध्ये जे सेवक आपत्कालीन कामकाजाचे आदेशान्वये संदर्भ क्र. 2 अन्वये मनपाचे काम करीत आहेत.

जे पूर्णवेळ व कोरोना प्रतिबंधासाठी दुसऱ्या दर्जातील कामकाज करीत आहे. अशा सर्व अधिकारी- कर्मचारी व ठेकेदार सेवक यांना आरोग्यसेवक यांच्या प्रमाणेच काही कमी का होईना? पण, सुरक्षा कवच महापालिकेकडून देण्यात यावे, असेही दीपाली धुमाळ यांनी पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.