Pune : शरद पवार ठोस भूमिका जाहीर करीत नसल्याने मुख्यमंत्री पदाचा ‘सस्पेन्स’ कायम!

9 नोव्हेंबरपूर्वी नवीन सरकार अस्तित्वात येणे आवश्यक

एमपीसी न्यूज – 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप हाच मोठा पक्ष ठरत असल्याचे निकालाच्या दिवशीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लक्षात आले. त्यामुळे पवार यांनी त्याच दिवशी आमचा भाजपला पाठिंबा असल्याचे लागेच जाहीर केले. त्यामुळे शिवसेनेला नाईलाजाने सरकारमध्ये सहभागी व्हावे लागले.

यावेळी चाणाक्ष पवार कोणतीही खंबीर भूमिका घेताना दिसून येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा ‘सस्पेन्स’ वाढला आहे. ते सध्या आम्हाला जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिल्याचे सांगत आहे. पण, पवार बोलतात एक आणि करतात दुसरेच. त्यामुळे भल्याभल्यांना त्यांचे राजकारण समजू शकले नाही. आठवडापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही शिवसेना – भाजपचे सत्तेच्या दृष्टीने काही पावले पडताना दिसून येत नाही.

काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने पवारांनाच राज्यातील अधिकार घेण्याची सूट दिल्याची कुजबुज आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा आकडा हा 100 पर्यंत जातो. त्यामुळे पवार नेमकी काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते, नेते संजय राऊत दररोज पत्रकार परिषद घेत आहेत. त्यांनी पवारांची भेट घेऊन भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण, पवार काहीही बोलले नाही. त्यामुळे भजपही स्वबळावर सत्ता आजमविण्याचा तयारीत आहे. पण, त्यांच्याकडे केवळ 105 आमदार आहेत. अपक्ष आमदारांचा पाठिंबा घेऊनही त्यांना 145 चा जादुई आकडा पार करता येत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.