Pune : शरद पवार गटातर्फे भाजपच्या हुकूमशाहीचा निषेध

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टीच्या हुकूमशाहीचा, (Pune)दडपशाहीचा निषेध व्यक्त करण्यासाठी शरद पवारांच्या पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुणे शहर मध्यवर्ती कार्यालय येथे जमून तीव्र आंदोलन केले.

यावेळी केंद्रीय निवडणूक आयोग, भारतीय जनता पार्टी (Pune)तसेच आदरणीय पवार साहेबांसोबत गद्दारी करून फुटलेल्या गटाचा सर्वांनी निषेध व्यक्त केला. निवडणूक आयोग नाही, फसवणूक आयोग… भाजप सरकार हाय हाय, लोकशाही हम शरमिंदा हैं अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

भारतीय जनता पार्टीने देशावर त्यांचा एकछत्री अंमल राहावा या नीच मानसिकतेतून देशातील सर्वच प्रादेशिक पक्षांना उध्वस्त करण्याचे धोरण अवलंबले आहे. शरद पवार यांनी अथक परिश्रमातून उभा केलेला पक्ष त्यांनी एका रात्रीत भाजपच्या झोळीत टाकला.

भारतीय जनता पार्टीच्या पिंजरातील पोपट असलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने आमच्या पक्षाचे नाव व चिन्ह या फुटीरगटाला देऊन जो अन्याय केला आहे याची साक्षीदार महाराष्ट्रातील तमाम जनता आहे.

Pune : मोदींजींना धन्यवाद देण्यासाठी नमो बाईक रॅलीचे आयोजन-सुनील देवधर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच नाव आणि चिन्ह पक्षातून फुटून भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेल्या गटाला आंदण देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अतिशय दुर्दैवी असून, या निर्णयानंतर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात शरद पवारांच्या विचारांवर वाटचाल करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पुणे शहर मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित करण्यात आली.

या बैठकीस शहरातील तमाम पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उदंड असा प्रतिसाद लाभला. जमलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातील असंतोष आता नियंत्रित करण्याच्या पलीकडे गेला आहे ही बाब या बैठकीत प्रकर्षाने जाणवली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख अमोघ ढमाले यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.