Pune : कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान जड वाहनांसाठी 40 किमी प्रतितास वेगमर्यादा निश्चित

एमपीसी न्यूज – मुंबई-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावरील वारंवार (Pune) होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांकरिता 40 किमी प्रतितास वेगमर्यादा निश्चित केल्याचे अंतिम आदेश पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी जारी केले आहेत.

राज्य शासन गृह विभागाच्या 27 सप्टेंबर 1996 च्या अधिसूचनेनुसार अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांच्या सूचना व हरकतींवर विचार करुन हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Pimpri : पिंपरी विधानसभा मतदार संघातील 545 गृहनिर्माण संस्थांमध्ये होणार मतदार नोंदणी अभियान

त्यानुसार टॅक्टर-ट्रेलर कॉम्बीनेशन, ट्रक-ट्रेलर, अर्टीक्युलेटेड व्हेइकल्स, मल्टी ॲक्सल वाहने, कंटेनर, मोठ्या आकाराच्या (Pune) मालाची वाहतूक करणारी वाहने आदी जड, अवजड वाहनांसाठी ही वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.