BNR-HDR-TOP-Mobile

Pune : महापालिकेच्या शाळेत स्व-संरक्षणाचे धडे द्या – मराठी कलावंतांची महापौरांकडे मागणी

एमपीसी न्यूज – महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या घटना टाळण्यासाठी, उपाययोजना म्हणून पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये मुलींना स्व-संरक्षणाचे धडे द्यावेत, यासाठी शुक्रवारी मराठी कलावंतांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली.

यावेळी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होत्या. याप्रसंगी मागणीचे निवेदनही कलाकारांच्या शिष्टमंडळाने दिले. यावेळी अभिनेते सुबोध भावे, दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सचिन गवळी यांच्यासह कलाकार उपस्थित होते.

या संवेदनशील विषयावर सकारात्मक पाऊल उचलणार असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3