Pune : धरणांत गतवर्षीपेक्षा यंदा 5 टीएमसी इतका जादा पाणीसाठा; उन्हाळ्यात पुणेकरांना मिळणार पुरेसे पाणी

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरजगाव आणि टेमघर या 4 धरणांत 28 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा आहे. मागील वर्षी या धरणांत केवळ 23 टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळे पुणे शहरावर पाणीकपतीचे संकट होते. यंदा 5 टीएमसी जादा पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यात पुरेसे पाणी मिळणार आहे. यावर्षी निर्सगराजाने दमदार हजेरी लावल्याने धरणांत 100 टक्के पाणीसाठा झाला.

नोव्हेंबर महिना सुरू झाला तरीही पाणीसाठा कायम होता. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. या चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे. धरणांत पुरेसा पाणीसाठा असला तरी पुणेकरांना पाणी मिळत नसल्याची ओरड होत आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांत भाजपला सामोरे जावे लागले. शिवाजीनगर मतदारसंघातील डेक्कन, आपटे रोड भागातील नागरिकांनी ‘पाणी नाही, तर मत नाही’, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. तर, धरण क्षेत्रात दमदार झालेल्या पावसामुळे सुमारे 20 टीएमसीपेक्षा जास्त पाणी नदीतून सोडण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.