Pune : विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बसणार चाप; लोकल आणि डेमूमध्ये 40 टीसींची नियुक्ती

एमपीसी न्यूज : लोकल आणि डेमूमध्ये तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या (Pune) प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असल्याने  लोकल आणि डेमूसारख्या गाड्यांमध्ये तिकीट पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. आता 40 तिकीट पर्यवेक्षक वेगवेगळ्या ट्रेनमध्ये फिरून प्रवाशांची तिकिटे तपासतील. तिकीट नसलेल्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज सुमारे 250 प्रवासी गाड्या धावतात. तिकीट पर्यवेक्षकांची संख्या कमी असल्याने अनेकदा गाड्यांमध्ये तिकीट पर्यवेक्षकांची नियुक्ती केली जात नाही. याचा फायदा घेत अनेक प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. त्यामुळे लोकल आणि डेमूलाच तिकीट पर्यवेक्षक नेमण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

PCMC : छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी महापालिकेचे अनुदान मंजूर

पुणे ते लोणावळा लोकलच्या दररोज 41 फेऱ्या होतात, तर पुणे ते दौंड दरम्यान (Pune) धावणाऱ्या DEMU आणि हडपसर ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजरमध्येही तिकीट पर्यवेक्षकांची नियुक्ती केली जाते.

वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी माहिती दिली, की लोकल, डेमू आणि पॅसेंजर ट्रेनमध्ये तिकीट पर्यवेक्षकांची नियुक्ती केली जाईल. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.