-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune: शाळा कशा व केव्हा सुरू करता येतील, याचा निर्णय लवकरच घेऊ- अजित पवार

Pune: We will soon decide how and when schools can be started- dcm Ajit Pawar

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपून आणि निश्चित कार्यपद्धती ठरवून शाळा कशा व केव्हा सुरू करता येतील, याचा निर्णय लवकर घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत सांगितले.

विभागीय आयुक्तालयात कोरोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, टाळेबंदीमुळे विविध क्षेत्रांतील उद्योग, व्यवसाय यांचे नुकसान झाले आहे. उद्योगांना उभारी देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत.

रोजगार उपलब्धतेसाठी उद्योग, व्यवसाय सुरू करून स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे. यासाठी शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत रोजगार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केले जातील.

ससून रुग्णालयासाठी मनुष्यबळ तसेच तातडीच्या साधनसामग्रीच्या दृष्टीने मंत्रालयस्तरावर असलेल्या प्रस्तावांना मंजुरी देऊ. राज्य शासनाचा आवश्यक निधी तातडीने देण्यात येईल.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn