Pune : पुणे महापालिका निवडणूक कधी ?

एमपीसी न्यूज – मागील 2 वर्षांपासून प्रशासक राज (Pune)असलेल्या पुणे महापालिकेची निवडणूक कधी होणार असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.
माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार सध्या कमालीचे अस्वस्थ आहेत.

तर, दुसरीकडे लोकसभा निवडणुकी नंतरच पुणे महापालिका निवडणूक होणार असल्याची कुजबूज सुरू आहे. ही निवडणूक तातडीने व्हावी यासाठी काहीजण न्यायालयात गेले आहेत. नगरसेवक झाल्यावर एक वेगळाच अनुभव असतो.

प्रभागात विकासकामे करावी लागतात. 2017 च्या मोदी लाटेत भाजपचे 98 नगरसेवक(Pune) निवडून आले होते. आता तशी परिस्थिती नाही. त्यामुळेच निवडणूक आयोग निवडणूक जाहीर करीत नसल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर निवडून आले आहेत. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणुक झाली.

Chakan : जाब विचारल्याच्या रागातून दुचाकी पेटवली

या निवडणुकीत धंगेकर यांनी पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांचा पराभव केला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार निवडून आल्यामुळे इतर पक्षांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यावर अजित पवार यांच्या गटाच्या पुणे शहराध्यक्षपदी दीपक मानकर यांची निवड करण्यात आली. मानकर यांनी सध्या पक्ष बांधणीवर जोर दिला आहे. नवीन कार्यकर्ते निर्माण केले जात आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.