-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : लोणावळा, मुळशी, सिंहगड परिसरात फिरणा-या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई 

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – लोणावळा, मुळशी, सिंहगड परिसरात फिरणा-या पर्यटकांवर पोलिसांनी रविवारी (दि.13) दंडात्मक कारवाई केली. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सध्या पर्यटनासाठी बंदी घातली आहे. मात्र, सुट्टीचा दिवस असल्याने रविवारी नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडले. पोलिसांनी पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करत त्यांना माघारी धाडले. 

लोणावळा परिसरात रविवारी सकाळी मोठी गर्दी पहायला मिळाली. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती. भुशी धरण, पवन मावळ, आंदर मावळ परिसरात पर्यटकांची गर्दी पहायला मिळाली. पोलिसांनी मात्र, पर्यटकांकडून दंड वसूल करत त्यांना घरचा रस्ता दाखवला. तसेच, सिंहगड, पानशेत आणि खडकवासला धरण परिसरात देखील पर्यटकांची गर्दी पहायला मिळाली.

वेल्हे पोलिसांनी तोरणा, राजगड आणि मढेघाट धबधबा या ठिकाणी जाण्यासाठी पोलिसांनी बंदी घातली आहे. पर्यटकांची चौकशी करण्यासाठी करंजवणे याठिकाणी चेकपॉईंट तयार करण्यात आला आहे. रविवारी पोलिसांनी पर्यटकांकडून 75 हजार रुपये दंड वसूल केला.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn