Pune News : खून का बदला खून ! पर्वती पायथ्याजवळ अल्पवयीन मुलाचा दहा जणांच्या टोळक्याकडून निर्घृण खून

एमपीसी न्यूज : दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पर्वती पायथा जवळ आठ ते दहा जणांच्या टोळीने एका अल्पवयीन मुलाचा निर्घुण खून केला. रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. सौरभ तानाजी वाघमारे (वय 17) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. दत्तवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आठ ते दहा जणांच्या टोळक्याने सौरभ याला पर्वती पायथा परिसरात गाठले. आणि कोयत्याने सपासप वार करत त्याचा खून केला. त्यानंतर हे टोळकं पसार झाले. माहिती मिळाल्यानंतर दत्तवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी तातडीने या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. दरम्यान खुनाच्या या घटनेने त्या परिसरात पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली.

मयत सौरभ वाघमारे याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. काही महिन्यापूर्वी त्याने आणि त्याच्या आणखी काही अल्पवयीन साथीदारांनी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव पठार परिसरात एका तरुणाचा खून केला होता. त्या खुनाचा बदला घेण्यासाठीच हा खून केल्याचे सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.