Punjab News : पंजाबमध्ये आता भ्रष्टाचार चालणार नाही; मुख्यमंत्री भगवंत मान यांची भ्रष्टाचाराविरोधात मोठी घोषणा

एमपीसी न्यूज – पंजाबला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री मान हे हेल्पलाईन नंबर जाहीर करणार असून त्यावर नागरिकांनी व्हिडीओ, ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवण्याचे आवाहन केले आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीत आपने 117 पैकी 92 जागांवर विजय मिळवला आहे. भगवंत मान यांनी बुधवारी (दि. 16) मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधीच्या वेळी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एकही दिवस वाया न घालवता कामाला सुरुवात करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मान यांनी मोठी घोषणा करत भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात असल्याचे घोषित केले.

भगवंत मान यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, शहिद भगतसिंग यांच्या शहीद दिनाच्या दिवशी (बुधवारी, दि. 23) अँटी करप्शन हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात येईल. तो माझा वैयक्तिक व्हाट्सअप नंबर असेल. तुम्हाला जर कोणी लाच मागितली तर त्याचे ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंग करून मला पाठवा. भ्रष्टाचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

पंजाब मध्ये आता भ्रष्टाचार चालणार नाही, असेही भगवंत मान यांनी जाहीर केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.