Pune News : गुरू अकॅडमी, आर. के.रॉय, एसजीपीसी, हरियाणा हाॅकी संघांची विजयाला गवसणी

एमपीसी न्यूज – गुरू हॉकी अकॅडमी हरियाणा, आर. के.रॉय अकॅडमी पटणा, एसजीपीसी अमृतसर, हॉकी अकॅडमी सोनीपत या संघांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा मोठ्या गोल फरकाने पराभव करून ५ व्या एसएनबीपी अखिल भारतीय १६ वर्षाखालील मुलांच्या हॉकी स्पर्धेत आज (दि.11 नोव्हें) विजय नोंदविला. पटणाच्या आर. के. रॉय अकॅडमी संघाने एफ गटात दोन्ही लढती जिंकून ६ गुणांसह बाद फेरीत प्रवेश केला. आज झालेल्या लढतींमध्ये एकूण ४४ गोल नोंदविले गेले.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील हॉकी मैदानावर एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एफ गटात पटनाच्या आर. के. रॉय अकॅडमीने पश्चिम बंगालच्या बेलकुलाई सीकेएसी विद्यापीठ संघाचा ७-० गोलने पराभव केला.

विजयी संघाकडून रोशन राज ३० व्या, ३५ व्या. व ४० व्या. मिनिटाला असे ३ गोल केले. ज्योतिश कुमारने १८ व्या, एमडी अलिशानने ४३ व्या, सुरज कुमारने ४५ व्या व सचिन कुमारने ६० व्या मिनिटाला प्रत्येकी एक गाल केला. पश्चिम बंगालच्या बेलकुलाई सीकेएसी विद्यापीठ संघाचे खेळाडू एकही गोल करू शकले नाही.

ब गटाच्या झालेल्या लढतीत हरियाणाच्या गुरू हॉकी अकॅडमीने तेलंगनाच्या मदर तेरेसा हायस्कूल संघाचा १७- ० गोलने धुव्वा उडवला. गुरू अकॅडमीकडून अकुंशने २ ऱ्या, ५ व्या, १७ व्या. मिनिटाला असे ३ गोल केले. यामध्ये अली रजाकने ७ व्या. मिनिटाला व मनदिप ९ व्या. मिनिटाला प्रत्यकी एक गोल केला. कुणालने ८ व्या. व ३४ व्या. मिनिटाला असे दोन गोल केले.

रसूल अक्केने १४ व्या, १६ व्या, १८ व्या, १९ व्या व २९ व्या मिनिटाला असे पाच गोल केले. जतिनने २६ व्या, ५७ व्या व ५८ व्या मिनिटाला तीन तर आदित्य ३६ व्या मि. कुमार पाशी ४० व्या. मि. प्रत्येकी एक गोल केला. पराभूत मदर तेरेसा हायस्कूल संघाच्या खेळाडूंकडून एकही गोल होऊ शकला नाही.

सोनीपतच्या हरियाणा हॉकी अकॅडमीने ए गटात रायपूरच्या स्मार्ट् हॉकी अकॅडमीला १४ – ० गोलने नमविले. हरियाणा अकॅडमीकडून साहिल रौलने २१, २४, ४८ व ५० व्या. मिनिटाला असे चार गोल केले. यामध्ये सुखविंदरने ३ ऱ्या , ७ व्या, २० व्या ५१ व्या मिनिटांचे असे चार गोल तर नितीनने ३८ व्या, ५२ व्या. व राहूलने ४४ व्या. व ५० व्या. मिनिटांचे प्रत्येकी दोन गोल केले. त्यांच्या मानव पॉलने ५ व्या. मिनिटाला एकमेव गोल केला. रायपूरच्या स्मार्ट् हॉकी अकॅडमीचे खेळाडू एकही गोल करू शकले नाही.

निकाल – 

  •  ब गट : गुरू हॉकी अकॅडमी, हरियाणा : १७ गोल (अकुंश २ ऱ्या , ५ व्या, १७ व्या. मि. ३ गो., अली रजाक ७ व्या. मि. १ गो., कुणाल ८ व्या., ३४ व्या. मि. २ गो., मनदिप ९ व्या. मि. १ गो, रसूल अक्के १४ व्या, मि., १६ व्या. मि, १८ व्या., १९ व्या मि., २९ व. मि. ५ गो.; जतिन २६ व्या मि., ५७ व्या., ५८ व्या मि.. ३ गो.; आदित्य ३६ व्या मि. १ गो.; कुमार पाशी ४० व्या. मि. १ गो.) वि. वि. मदर टेरेसा हायस्कूल तेलंगना : शून्य गोल.
  • एफ गट : आर. के. रॉय अकॅडमी, पटणा : ७ गोल (रोशन राज ३०, ३५ व्या. व ४० व्या. मि. ३ गोल, ज्योतिश कुमार १८ व्या मि. १ गो., एमडी अलिशान ४३ व्या मि. १ गो., सुरज कुमार ४५ व्या मि. १ गो., सचिन कुमार ६० व्या मि. १ गो.) वि. वि. बेलकुलाई सीकेएसी विद्यापीठ, पश्चिम बंगाल : शून्य गोल;
  • इ गट : एसजीपीसी अकॅडमी, अमृतसर : ६ गोल (दिलजीत सिंग ४, २७, ५० व्या मि. ३ गो. हर्षदिप सिंग १६ व. मि. १ गो., गोविंदा सिंग ३६ व्या. मि. १ गो.) वि. वि. हॉकी युनिट ऑफ तमिलनाडू : शून्य गोल
  • ए गट : हरियाणा हॉकी अकॅडमी, सोनीपत : १४ गोल (साहिल रौल २१ व्या., २४ व्या, ४८ व्या, ५० व्या. मि. ४ गो., सुखविंदर ३ ऱ्या , ७ व्या., २० व्या., ५१ व्या. मि. ४ गो., नितीन ३८ व्या. मि., ५२ व्या. मि., २ गो., राहूल ४४ व्या. मि., ५० व्या.मि., २ गो., मानव पॉल ५ व्या. मि. १ गोल) वि. वि. स्मार्ट हॉकी अकॅडमी, रायपूर : शून्य गोल).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.