Rain Update : पिंपरी चिंचवड शहरात पावसाची हजेरी

Presence of rain in Pimpri Chinchwad city

एमपीसी न्यूज – काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पिंपरी चिंचवडमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. निसर्ग चक्री वादळानंतर दडी मारलेल्या पावसाने आज, बुधवारी शहरात हजेरी लावल्यामुळे पिंपरी चिंचवडकर काहीसे सुखावले आहेत.

निसर्ग चक्री वादळानंतर शहरातून पाऊस गायब झाला होता. अधूनमधून तुरळक सरी कोसळत होत्या. मागील काही दिवसापासून उन्हाचा तडाखाही वाढला होता. वातावरणातील उष्णतेमुळे शहरवासीय चांगलेच हैराण झाले होते.

दरम्यान, पावसाने आज अचानक हजेरी लावल्यामुळे पिंपरी चिंचवडकर काहीसे सुखावले. वातावरणातही गारवा निर्माण झाला.

जून महिना संपत आला तरी दमदार पाऊसाची शक्यता दिसत नव्हती. त्यामुळे चिंतेत असणारे शहरवासीयांना आजच्या पावसाने दिलासा मिळाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like