Raj Thackeray Pune Visit : “एकदा काय ते होऊनच जाऊ दे” राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेचा टिझर जाहीर…

एमपीसी न्यूज – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या रविवारी पुण्यात जाहीर सभा होणार आहे. स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी ही सभा पार पडणार आहे. या सभेचा टिझर आता मनसेकडून जाहीर करण्यात आलाय. हा टिझर पाहता मनसेची ही सभा वादळी ठरणार यात शंका नाही. औरंगाबाद येथील सभेतील, ” सांगूनही समजत नसेल तर, एकदा काय ते होऊनच जाऊ दे” या राज ठाकरेंच्या ओळीने टिझरची सुरुवात होते.. त्यामुळे एकंदरीत राज ठाकरे यांची पुण्यातील ही सभा वादळी ठरणार यात कुठलीही शंका नाही.

मागील दोन दिवसांपासून राज ठाकरे यांची पुण्यातील सभा होणार की नाही होणार अशा चर्चा सुरू होत्या. पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून डेक्कन परिसरातील भिडे पुलानजीक असणाऱ्या नदीपात्रात आणि सप महाविद्यालयाच्या मैदानावर सभेसाठी परवानगी देखील मागितली होती. त्यातील नदीपात्रातील सभेसाठी परवानगी देखील देण्यात आली होती. मात्र खराब हवामानाचा अंदाज आणि पाऊस पडण्याची शक्यता यामुळे नदीपात्रातील सभा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे आहे.

राज ठाकरे पुण्यातील दोन दिवसीय दौरा संपवून नुकतेच मुंबईला परतले आणि त्यानंतर आज या सभेची घोषणा करण्यात आली. येत्या 5 जून रोजी राज ठाकरे आयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौराला यूपीतील खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यासह काही साधुसंतांनी विरोध केला आहे. या सर्वांचा राज ठाकरे आपल्या भाषणातून समाचार घेतील अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.