Sanskar Pratishthan : संस्कार प्रतिष्ठानचे रक्षाबंधन भारतीय सैनिकांसोबत!

एमपीसी न्यूज : भारत देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संस्कार प्रतिष्ठान (Sanskar Pratishthan) महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पंजाबमधील भारत-पाकिस्तानच्या आटारी (वाघाबॉर्डर) बॉर्डरवरील सैनिकांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात येणार आहे.

Independence Day : शहरात 12 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान विशेष स्वच्छता मोहिम

महाराष्ट्रातील नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यातील 75 महिला 75 राख्या घेऊन 75 झेंडे घेऊन शनिवार 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता झेलम एक्स्प्रेसने रवाना होणार आहेत. या रक्षाबंधनचे वैशिष्ट्य असे, की यामध्ये मराठी अभिनेत्री रुपाली पाथरे सहभागी (Sanskar Pratishthan) होणार आहे. हे दुसरे वर्ष आहे. यासाठी महिला सभासदांनी एकसारख्या साड्या त्यावर लागणारे साहित्य खरेदी केले आहे. याची तयारी 4 महिन्यापासून आहे. याचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड, मनोहर कड, प्रतिभा पुजारी, सायली सुर्वे, आनंद पुजारी, भारती कदम, दत्तात्रय देवकर, आनंद पाथरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.