Real Pune United : रेयाल पुणे युनायटेड, कमांडो, सिटी पोलिसची आगेकूच

एमपीसी न्यूज : रेयाल पुणे युनायटेड (Real Pune United), कमांडो, सिटी पोलिस, अस्पायर एफसी आणि पुणे वॉरियर्स चमकदार विजय मिळवून सुरू असलेल्या पीडीएफए लीग स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली. प्रथम श्रेणीतील सामन्यात रेयाल पुणे युनायटेडने आजचा सर्वात मोठा विजय मिळविला. त्यांनी अ गटातील सामन्यात आर्यन्सचा 5-1 असा पराभव केला. मयांक चतुर्वेदी याने हॅटट्रिक साधताना 13, 50 आणि 56 व्या मिनिटाला गोल केले. स्वप्निल पवारने 14 आणि मोहित देवरे याने 58 व्या मिनिटाला गोल करून संघाचा विजय मोठा करण्यात आपला वाटा उचलला. आर्यन्सकडून नईम सय्यद याने 66 व्या मिनिटाला गोल केला.

सी गटात कमांडोने दोन्ही सत्रात एकेक गोल करत टायगर कंबाईनचा 2-0 असा पराभव केला. अनिकेत पवार याने 12, तर हृषिकेश चव्हाण याने 63 व्या मिनिटाला गोल केला.

ब गटातील सामन्यात सिटी पोलिसने रेंजहिल्सचे आव्हान 2-0 असे सहज मोडून काढले. योगेश वाव्हळ याने 32, तर संदीप लाडकर याने 57 व्या मिनिटाला गोल केला.

महिला लिगमधील सुपर 6 गटात अस्पायर एफसीने पहिला विजय मिळविला. त्यांनी सिटी गर्ल्स गो स्पोर्टसचा 2-1 असा पराभव केला. मुरीएल अॅडम हिने सातव्याच मिनिटाला अस्पायरचा गोल केला. त्यानंतर भक्ती बिरांगडी हिने 25व्या मिनिटाला आघाडी दुप्पट केली. गो स्पोर्टसचा एकमात्र गोल अस्मी कुलकर्णी हिने 53व्या मिनिटाला केला. अस्पायरचे चार गुण झाले असून गो स्पोर्टसचा (Real Pune United) हा दुसरा गोल ठरला.

निकाल –
सिटी स्पोर्टस अरेना, मोशी – प्रथम श्रेणी
गट सी – कमांडो 2 (अनिकेत पवार 12वे, हृषिकेश चव्हाण 63वे मिनिट) वि.वि. टायगर कम्बाईन 0
गट अ – रेयाल पुणे युनायटेड 5(मयांक चतुर्वेदी 13, 50आणि 56वे मिनिट, स्वप्निल पवार 14वे, मोहित देवरे 58वे मिनिट) वि.वि. आर्यन्स 1 (नईम सय्यद 66वे मिनिट)
गट ब – सिटी पोलिस 2 (योगेश व्हाव्हळ 32वे, संदीप लाडकर 57वे मिनिट) वि.वि. रेंज हिल्स रंग बॉईज 0

एसएसपीएमएस मैदाना – महिला लिग – सुपर ६
अस्पायर एफसी 2 (म्युरिएल अॅडम 7वे, भक्ती बिरांगडी 25वे मिनिट) वि.वि. सिटी स्पोर्टस गो स्पोर्टस 1 (अस्मी कुलकर्णी 53वे मिनिट)
उत्कर्ष क्रीडा मंच अ 0 बरोबरी वि. डेक्कन इलेव्हन 0
पुणेरी वॉरियर्स 2 (किर्ती गोसावी 43वे मिनिट, ऐश्वर्या जगताप 61वे मिनिट) वि.वि. स्निग्मय एफसी 0

14 वर्षांखालील – Real Pune United
लौकिक एफए पुढे चाल वि. पुणे वॉरियर्स
गेमऑफ गोल एफसीसी पुढे चाल वि. अर्बन इंटेन्सिटी
सिटी एफसी पुणे पुढे चाल वि. चोंदे पाटिल एफसी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.