Bhosari : सराईत आरोपीला अटक; पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज – भोसरी पोलिसांनी सराईत आरोपीला अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस असा एकूण 20 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी (दि. १७) सायंकाळी केली.

भीमजीत नागेश राऊत (वय 28, रा. त्रीवेणीनगर, निगडी), असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ एक तरुण संशयितरित्या उभा असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून भीमजीत याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता हे पिस्तूल बेकायदेशीर असल्याचे आढळून आले.

त्यानुसार भीमजीत याला अटक करण्यात आली. त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल असून तो सराईत आरोपी आहे. भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.