Panshet Dam News : पानशेत धरणातून 2604  क्युसेक विसर्ग चालू 

एमपीसी न्यूज – पानशेत धरणामधून नदीपात्रामध्ये सुरू असणाऱ्या 4558 क्यूसेक्स विसर्ग कमी करून ठीक रात्री 9.00 वा. सांडव्याद्वरे 1954 क्युसेक्स व विद्युत निर्मिती केंद्राद्वारे 650 क्युसेक्स, एकूण 2604 क्युसेक्स करण्यात आला आहे, असे यो.स.भंडलकर, सहाय्यक अभियंता, खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी सांगितले आहे.

आवश्यकतेनुसार विसर्गमध्ये बदल संभवू शकतो.नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये.नदीपात्रात काही साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत.पानशेत धरण हे आंबी नदीवर बांधण्यात आले आहे. आंबी नदी ही मुठा नदीची उपनदी आहे. या दोन्ही नद्यांच्या काठावर लोकांनी सतर्क रहावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.