Indian Railway : व्हिस्टाडोमसह प्रगती एक्सप्रेस पुन्हा सुरु

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे गेल्या अडीच वर्षांपासून बंद असलेली प्रगती एक्स्प्रेस (Indian Railway)  पुणे मुंबई दरम्यान सोमवारपासून व्हिस्टाडोम कोचसह धावू लागली. पहिल्या दिवशी व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

पुणे  – मुंबई प्रगती एक्स्प्रेस सोमवारी सकाळी सात वाजून 50 मिनिटांनी पुण्याहून मुंबईकडे रवाना झाली. प्रवाशांच्या मागणीमुळे प्रगती एक्स्प्रेसला व्हिस्टाडोम कोच जोडला आहे. यापूर्वी पुणे मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, (Indian Railway) डेक्कन क्वीनला व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आले आहेत.

 

 

पुणे – मुंबई मार्गावरील निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी प्रवाशांकडून व्हिस्टाडोमला  (Indian Railway) मागणी वाढत असल्यामुळे या गाडीला व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.रेल्वे प्रशासनाने ही गाडी पूर्वीच सुरु करण्याची आवश्यकता होती. या गाडीला आणखी कोच वाढविण्याची गरज आहे, अशी मागणी रेल्वे प्रवासी मंचाच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.