Mhalunge Crime : रिक्षा चालकाने चाकूचा धाक दाखवून तरुणास लुटले

एमपीसी न्यूज –  रिक्षा चालक व त्याच्या साथीदारांनी (Mhalunge Crime) एका तरुणाला चाकुचा धाक दाखवून लुटले आहे. हा प्रकार निघोजे येथील महिंद्रा कंपनीच्या गेट क्रं. 8 समोर गुरुवारी (दि.19) रात्री घडला.

याप्रकऱणी अमन माधव भिसे (वय 21 रा. खराबवाडी) यांनी शनिवारी (दि.21) फिर्याद दिली असून म्हाळुंगे पोलीस ठाण्यात चार अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pune News : पुण्यात महिला टेनिस स्पर्धेची सुरूवात, 15 देशांचा खेळाडूंचा सहभाग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी जात असताना आरोपी तेथे रिक्षामध्ये बसले होते. यावेळी रिक्षा चालक व त्याच्या तीन साथीदारांनी फिर्यादीला अडवले व चाकुचा धाक (Mhalunge Crime) दाखवून त्यांच्याकडील 20 हजार रुपयांचा लॅपटॉप, 15 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 35 हजार रुपयांचा ऐवज लुटला. याप्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.