Pune News : माजी सभापती रामभाऊ बोरचटे यांच्या घरावर सशस्त्र दरोडा, 28.50 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस

एमपीसी न्यूज : बेल्हे गावातील माजी सभापती रामभाऊ  बोरचटे यांच्या बंगल्यावरील सशस्त्र दरोड्यामध्ये 28.50 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. (Pune News) अशी माहिती आळे फाटा पोलिसांनी दिली आहे.

Pimpri News : पवना नदीत सोडले जातेय ड्रेनेजचे पाणी; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष – श्रीरंग बारणे

हा दरोडा आज सोमवार 19 डिसेंबर 2022 रोजी पहाटे 2.05 वा ते 3.35 वा चे दरम्यान बेल्हा येथे टाकण्यात आला आहे. सदाशिव बोरचटे, वय 51 वर्ष, रा. बेल्हे यांनी आळे  फाटा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भा.द.वि कलम 395, शस्त्र अधिनियम 3, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवार 19 डिसेंबर 2022 रोजी पहाटे 2.05 वा ते 3.35 वा चे दरम्यान बेल्हा, तालुका जुन्नर, जि. पुणे येथे फिर्यादी त्यांच्या राहत्या घरातील बेडरूम मध्ये झोपले होते.(Pune News) तसेच त्यांची पत्नी सुरेखा व मुलगा सुमित हा वरच्या मजल्यावर त्यांच्या खोलीत झोपले होते. तसेच वरच्या मजल्यावर रामभाऊ हे त्यांच्या खोलीमध्ये झोपलेले होते.

त्या वेळेस एकूण सहा अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घराच्या कंपाउंड ची जाळी कट करून तेथून आत प्रवेश करून घराच्या हॉलच्या भिंतीची जाळी कट केली व त्याद्वारे घरात येऊन फिर्यादीच्या घरावर दरोडा टाकला.

फिर्यादी, पत्नी सुरेखा, मुलगा सुमित व रामभाऊ अशा चार जणांना एका खोलीमध्ये नेले व त्यांना कोयता व पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्या अंगावर असणारे सोन्याचे दागदागिने व रोख रक्कम असा एकूण 28.50 लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन गेले. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकून फिर्यादी, पत्नी सुरेखा, मुलगा सुमित व रामभाऊ यांना बेडरूम मध्ये बंद केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.