Pune News : पुणे मेट्रो” चे नाव वापरून कोट्यवधी रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज : पुण्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या कामगार पुतळा परिसरात असलेल्या जागेवर मेट्रोचा प्रकल्प होणार असल्याचे खोटे सांगुन गुंतवणुकीच्या (Pune News) आमिषाने दोघांनी व्यावसायिकासह नातेवाईकांची तब्बल 1 कोटी 21 लाखांची फसवणूक केली आहे. पंकज गुल जगासिया (43) यांनी या संबंधी तक्रार दिली आहे.

या प्रकरणी ईश्वर चंदुलाल परमार (70) व सनत ईश्वर परमार (46) यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ईश्वर परमार व सनत परमार यांच्या कामगार पुतळा परिरसातील स्वतःच्या जागेवर मेट्रोचा प्रकल्प होणार होता.(Pune Crime) मात्र, संबंधित जागेवर विकसनाचे अधिकार त्यांना नव्हते. तरीही दोघांनी फसवणुक करण्याच्या उद्देशाने संबंधित जागेवर प्रोजेक्ट होणार असल्याचे खोटे कारण पंकज जगासिया यांना सांगितले. गुंतवणुक केल्यास जादा रक्कम देण्याचे अमिष त्यांना दाखवले.

Wakad News: राहुल कलाटे आयोजित दीपोत्सव विशेष भव्य रांगोळी स्पर्धेत हर्षा देशमुख प्रथम

आरोपींनी संबंधित प्रोजेक्टमध्ये लोकांना गुंतवणुक करण्यास भाग पाडुन 1 कोटी 21 लाख रुपये घेतले. मात्र 2016 पासून आतापर्यंत त्याठिकाणी कोणतेही बांधकाम करण्यात आले नाही. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.