Sangvi : भरदिवसा चोरी; अडीच लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – भरदिवसा फ्लॅटच्या दरवाजाची कडी उचकटून त्याद्वारे घरातून 2 लाख 42 हजार रुपये किमतीचे 97 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 20) दुपारी एक ते रात्री साडेसात या वेळेत सुदर्शन नगर पिंपळेगुरव येथे घडली.

विजय विठ्ठल भांगरे (वय 38, रा. रुमसंगम रेसिडेन्सी, सुदर्शननगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय आणि त्यांच्या पत्नी नेहमीप्रमाणे दुपारी एकच्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाची कडी उचकटून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. बेडरूम मधील कपाटाचे लॉकर तोडून कपाटातील 2 लाख 42 हजार रुपये किमतीचे 97 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. रात्री साडेसात वाजता विजय घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.