Sangvi : दाबेली विक्रेत्याला कोयत्याचा धाक दाखवत लुटले

एमपीसी न्यूज – जुनी सांगवी येथील दाबेली विक्रेत्याला तिघांनी शिवीगाळ करत व कोयत्याचा धाक दाखवून लुटले. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. ही घटना जुनी सांगवी येथे सद्गुरू स्नॅक्स सेंटरवर बुधवारी (दि. 27) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

किरण नंदकुमार शेवाळे (वय 33, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जोग्या उर्फ अक्षय हेमंत जाधव (रा. जुनी सांगवी) व त्यांचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील जोग्या याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण याचे जुनी सांगवी येथील ढोरे चौक येथे कच्ची दाबेलीचे स्नॅक्‍स सेंटर आहे. तेथे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपी आले. काहीही कारण नसताना आरोपींनी फिर्यादीला दमदाटी करण्यास सुरुवात केली व ‘दाबेली दे’ म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर खिशातील 500 रुपये काढून घेत स्नॅक्‍स सेंटच्या काऊंटरवर कोयता मारून काऊंटरची काच फोडून ‘बघून घेईन’ अशी धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.