Pimpri Crime News : दुकान फोडून स्क्रॅपची चोरी

एमपीसी न्यूज – दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी स्क्रॅपची चोरी केली. हा प्रकार पिंपरी येथील मोरवाडी एमआयडीसी, सम्राट चौकाजवळ 14 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत घडला.

शमीर समसुद्दिन चरणीया (वय 45, रा. येरवडा) यांनी या प्रकरणी शुक्रवारी (दि. 24) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे सम्राट चौकाजवळ स्क्रॅपचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी भिंतीचे पत्रे उचकटून स्क्रॅपच्या दुकानात प्रवेश केला. दुकानातून पंचवीस हजार रुपये किमतीच्या लाकडी वस्तू व दहा हजार रुपये किमतीच्या लोखंडी वस्तू असे एकूण 35 हजार रुपये किमतीचे स्क्रॅपचे लाकडी व लोखंडी साहित्य चोरून नेले. याप्रकरणी पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.